Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

मॅगीवाली पाणीपुरी व्हायरल !

Maggiwali Panipuri goes viral! Marathiमॅगीवाली पाणीपुरी व्हायरल ! Lokpriya News In Webdunia Marathi
, गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (18:16 IST)
खाद्य पदार्थात चव येण्यासाठी लोक नवीन नवीन प्रयोग करतात. पण हा केलेला प्रयोग सर्वांनाच आवडेल असे नाही. सध्या सोशल मीडियावर बरेच फूड ब्लागर्स आले आहेत. ते नवीन नवीन चॅलेंज घेतात. सध्या सोशल मीडियावर मॅगी पाणीपुरी व्हायरल झाली असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अक्षरशः लोकांनी कपाळाला हात लावला आहे. जगाचा अंत आता जवळ आला आहे. असे लोकांचे म्हणणे आहे. पाणीपुरी हे सर्वानाच आवडणारे पदार्थ आहे. असे कोणी नसेल ज्याला हे आंबट गोड तिखट पदार्थ खायला आवडत नसेल. लोक पाणीपुरीत शेव घालून खातात. त्यात बटाटे घालतात. पण सध्या मॅगी च्या पाणीपुरी चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या मध्ये पाणी पुरीत बटाट्याऐवजी चक्क मॅगी भरली जात आहे. आणि लोक ते खात आहे. 

हा व्हिडीओ 11 सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ पाहून पाणीपुरीप्रेमींना धक्का बसला आहे. पाणीपुरीवर केला जाणारा हा प्रयोग पाहून लोक संतापले आहे. 
 
मॅगी पाणीपुरीचा हा व्हिडिओ ट्विटरवर @Iyervval या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खूपच त्रासदायक आणि धक्कादायक व्हिडिओ.हा व्हिडिओ आतापर्यंत 74 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एकयुजर म्हणतो की ते इतके वाईट नाही. पाहिले तर फंटा मॅगी, गुलाब जामुन के पकोडे आणि गुलाब जामुन पराठे आणि ओरियो पकोडे आजही अव्वल स्थानावर आहेत. तर  दुसरा यूजर म्हणतो की, हे पाहून मला उपाशी राहावेसे वाटतआहे. तर आणखी एका युजरचे म्हणणे आहे की, अशा गोष्टी पाहिल्याने उलट्या होतात. याशिवाय काही वापरकर्त्यांनी अशा विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. एकंदरीत ही पाणीपुरीची फ्युजन रेसिपी पाहून लोकांचा संताप झाला आहे
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2 ते 6 वर्षाच्या वयोगटातील मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळेल