गुरुवारी सकाळपासून अचानक ट्विटरवर #BoycottShahRukhKhan ट्रेंड करत आहे. शाहरुख खानसोबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे एक फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि संपूर्ण प्रकरणाची सुरुवात येथून झाली आहे.
सोशल मीडियावर यूजर्स इमरान खानसोबत शाहरुखचे जुने चित्र शेअर करून राग काढत आहेत. ते अभिनेत्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी नुकतीच सत्ता काबीज केल्यापासून इम्रान खानवर तालिबानला मदत केल्याचा आरोप होत आहे. तालिबान सरकारमध्ये कोण असेल आणि कोण नाही याचा निर्णय पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या संचालकांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
इम्रानसोबत शाहरुखचा फोटो बघून भडकले लोक
दरम्यान, इम्रान खानसोबत शाहरुख खानचा एक फोटो समोर आल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शाहरुखला इम्रानसोबत पाहून यूजर्स स्तब्ध झाले आणि खानवर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.
सोशल मिडीयावर अनेकजण शाहरूखविरोधात संताप व्यक्त करत आहे. या व्हायरल फोटोमध्ये शाहरूख व इमरान खान हसत हसत गप्पा करताना दिसत आहेत. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्याचा पारा चांगलेच पेटला.
भारतात राहून शाहरूख पाकिस्तानचे कौतुक करतो, असा आरोप करत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.