Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्मीमुळे राहुल गांधी त्रस्त, भाषणात डोक्यावर टाकले बॉटलमधील पाणी

rahul gandhi
, बुधवार, 29 मे 2024 (10:40 IST)
देशातील अनेक भागांमध्ये भीषण गरमी पडत आहे. अनेक राज्यांमध्ये तापमान 50 डिग्री पर्यंत पोहचले आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या शेवट्च्या टप्यात आपल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी सर्व पक्षाचे नेता दिवस रात्र एका करत आहे. तसेच सर्व नेते उन्हापासून वाचण्याचे देखील सांगत सल्ले देत आहे. या दरम्यान गरमीने त्रस्त पूर्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील एक निवडणूक रॅलीमध्ये भाषण देतांना स्वतःच्या डोक्यावर पाण्याची बाटली टाकतांना दिसले. 
 
काँग्रेसचे वरिष्ठ नेता राहुल गांधी मंगळवारी जेव्हा देवरिया मध्ये भाषण देत होते तेव्हा त्यांना भाषणदरम्यान खूप उष्णतेचा सामान करावा लागला. भाषण करतांना त्यांनी पाणी पिले व लोकांना म्हणाले की, खूप गरमी आहे. यानंतर त्यांनी पाण्याची बाटलीचं डोक्यावर ओतली व हे पाहून सभेतील लोकांनी टाळ्या वाजवल्या. 
 
राहुल गांधी बांसगांव लोकसभा सीट मधून काँग्रेस उमेदवार सदल प्रसादसाठी मत द्या म्हणून आवाहन करीत होते. या लोकसभा सिटीमध्ये गोरखपुर जिल्ह्याचे चौरी-चौरा, बांसगांव आणि चिल्लूपारच्या  विधानसभा क्षेत्र आणि देवरिया जिल्ह्याचे रुद्रपुर आणि बरहजचे विधानसभा क्षेत्र सहभागी आहे. 
 
बांसगांव लोकसभा सीटमधून आठ उमेदवार मैदान मध्ये आहे. तसेच मुख्य निडणूक सामना निवर्तमान सांसद व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमलेश पासवान आणि काँग्रेसचे सदल प्रसाद मध्ये आहे. इथे सातवे शेवटच्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'एक्साइज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईमुळे होते आहे नुकसान...', पुणे पोर्श प्रकरणानंतर घेतलेल्या एक्शनवर बोललेले पब आणि बार मालक