Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपने महाराष्ट्रासाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली,दक्षिण पश्चिम नागपूर मधून फडणवीस यांना उमेदवारी

भाजपने महाराष्ट्रासाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली,दक्षिण पश्चिम नागपूर मधून फडणवीस यांना उमेदवारी
, रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (15:54 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होणार असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून, मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून, मंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून,

श्रीजया अशोक चव्हाण भोकरमधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून निवडणूक लढवणार आहेत. कुलाब्यातून राहुल नार्वेकर आणि साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर आहे. मतमोजणीची तारीख 23 नोव्हेंबर आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गट सक्रिय, हा असणार प्लॅन