Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य प्रदेशातील राज्यमंत्र्यांची मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट

manju ravendra
, सोमवार, 27 मार्च 2023 (17:50 IST)
अमळनेर: मध्य प्रदेशतील मंडी बोर्ड विभागाच्या राज्यमंत्री सुश्री मंजू रावेंद्र दादू यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट ली.  याप्रसंगी श्रीमती दादू यांनी मंगळग्रह  देवतेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत इच्छापूर (जि. ब-हाणपूर) जनपंचायतीचे सदस्य नामदेव विठ्ठल महाजन उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी त्यांना मंदिरासंदर्भातील विस्तृत माहिती दिली. तसेच संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दलही सांगितले. मंदिर परिसरात अतिशय सकारात्मक ऊर्जा जाणवत असून, मन प्रसन्न करणारे येथील वातावरण असल्याचे मत राज्यमंत्र्यांनी व्यक्त केले. भविष्यात हे मंदिर नक्कीच खूप मोठे व भव्यदिव्य होईल, असा विश्वास  देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नंदुरबारच्या उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांची मंगळग्रह मंदिराला भेट