‘आपली एकी तुटायची नाही‘, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी दुमलेले कोल्हापूर
राज्यात अनेक शहरांमध्ये गर्दीचा नवा विक्रम करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा शनिवारी कोल्हापूरमधून काढण्यात आला. यावेळी सुद्धा लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र जमला. याशिवाय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राबरोबरच सीमाभाग, कोकणसह गोवा राज्यातूनही हजारो लोक मोर्चात सहभागी झाले. शहरातील ताराराणी चौक, गांधी मैदान, सायबर कॉलेज, पेव्हीलीयन ग्राऊंड या चार ठिकाणाहून मोर्चेकरी दसरा चौकात दाखल झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात पाच तरूणींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिस्तबध्द मोर्चाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली. याआधी मोर्चाच्या माध्यमातून कोपार्डी बालात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कायद्यातील काही अटी शिथिल कराव्यात, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सादर करण्यात आले.