मनोज जरांगे हे मराठा आरक्षण अध्यादेश लागू व्हावा या साठी 10 फेब्रुवारी पासून उपोषणावर बसले आहे. काल आंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. नंतर त्यांचा मोर्चा सागर बंगल्याकडे वळाला मात्र संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांना आंतरवली सराटी जावे लागले. काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर बीड, जालना या काही भागात इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर येथे एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे
जालन्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना -घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली असून अज्ञातांनी तीर्थपुरी गावात अंबड येथून रामासगावा कडे जाणाऱ्या एसटी बसला पेटवले