वर्ष 2017 हे तुम्हाला संमिश्र फळे देणारे ठरणार आहे. गुरू राशीच्या षष्ठात आणि सध्या शनी अष्टमात असल्याने विशेष अनुकूल दिसत नाही आहे. अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्न निर्माण होतील. ते सोडविण्यामध्ये तुमचा बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. आता शनी भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल. मात्र गुरू षष्ठस्थानात जाणार आहे. त्यामुळे आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नका म्हणजे सर्व काही ठीक होईल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... व्यवसाय, धंद्यात किंवा स्पर्धेच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वावरत असाल तर येत्या वर्षात तुम्हाला सतर्क राहणे फारच गेरजेचे आहे कारण तुम्हाला व्यापार-उद्योगात खट्टा-मीठा असा अनुभव येईल. खर्च कमी झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. गुंतवणूक जास्त, त्या प्रमाणात फायद्याचे प्रमाण कमी राहील. कामात तांत्रिक आणि आधुनिक बदल याकडे लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत बढती किंवा पदोन्नती यांसारख्या गोष्टी मागेपुढे होतील. एप्रिल-मेनंतर नवीन जागी बदली होईल. पुन्हा पूर्वीच्या जागी यायला साधारण दोन ते अडीच वर्षे जातील. नोकरीत बदल करू इच्छिणार्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. जुनी कोर्ट प्रकरणे किंवा इतर गुंतागुंतीचे प्रश्न फेब्रुवारीमध्ये मार्गी लागायला लागतील. पण अपेक्षित यशासाठी तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागेल. जानेवारी-मार्च हा कालावधी प्राप्तीच्या दृष्टीने चांगला आहे. काही जुनी कर्जे फेडू शकाल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... या वर्षी घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता राहील. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासाठी विशेष खर्च करणे भाग पडेल, पण तो खर्च चांगल्या कामासाठी असल्याने त्याचे वाईट वाटणार नाही. कुटुंबातील काही जुने प्रश्न आटोक्यात येतील. फेब्रुवारीनंतर त्यावर उपाय काढता येईल. आपुलकीच्या व्यक्तींची आणि मुलांची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ची प्रकृती सांभाळा. नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना अंथरूण पाहून पाय पसरा. नातेवाइकांच्या फार जवळ जाऊ नका. प्रवासयोग संभवतो. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा, अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नये. महिलांना घरामधल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत दक्ष राहावे लागेल. मधूनच प्रियजनांची काळजी वाटेल. विद्यार्थ्यांना ग्रहांची फारशी साथ नाही. त्यांनी बेसावध न राहिला पाहिजे. कलाकार आणि खेळाडूंना फेब्रुवारी आणि मार्चनंतर त्यांचे प्रावीण्य दाखवायला चांगली संधी मिळेल. त्याचा त्यांना फायदा उठवावा लागेल. सामूहिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींनी सतत सजग राहावे.