आयुर्वेदात केवळ औषधी वनस्पतींच्या गुणधर्माबद्दलच नव्हे तर खाण्या-पिण्यात आणि राहणीमाना बद्दल बरेच काही लिहिले आहेत. आज आम्ही आयुर्वेदानुसार केसांमध्ये तेल लावण्याचे फायदे आणि योग्य वेळ सांगत आहोत.
* केसांमध्ये तेल लावण्याचे फायदे-
'चंपी' किंवा डोक्याची मॉलिश करण्याची प्रथा पिढ्यांपासून चालत आली आहे आणि बरेच लोक केसांना धुण्याच्या पूर्वी मॉलिश करतात. असे मानतात की केसांना तेल लावण्याने केसांना पांढरे होण्यापासून रोखता येऊ शकतो, जेणे करून केस बळकट होतात आणि प्रेशर पॉइंट्स वर मॉलिश केल्याने तणाव कमी होतात.
आयुर्वेदानुसार तेल लावण्याशी निगडित काही खास गोष्टी -
* आयुर्वेदानुसार, डोकेदुखी वाताशी निगडित आहे. म्हणून संध्याकाळी 6 वाजता केसांना तेल लावावे. दिवसाचा हा काळ वात दूर करण्यासाठी योग्य आहे.
* आपण केस धुण्यापूर्वी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तेल लावू शकता. केसांना धुतल्यानंतर तेल लावू नका, कारण या मुळे केसांमध्ये धूळ आणि घाण होण्याचा त्रास होऊ शकतो.
* केसांना नियमितपणे तेल लावल्याने स्कॅल्प मध्ये कोंडा होणं आणि खाज येण्याची समस्या दूर होऊ शकते. तेलात कडुलिंबाची पाने घालून गरम करा आणि अंघोळीच्या पूर्वी स्कॅल्प मध्ये चांगल्या प्रकारे लावा. या नंतर कोमट पाण्याने केस धुऊन घ्या. कोंड्याचा त्रास नाहीसा होईल.
* रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना आणि स्कॅल्प ला चांगल्या प्रकारे तेल लावावे.सकाळी कोमट पाण्याने धुऊन घ्या.
* रात्री झोपण्याच्या अर्धा तास पूर्वी केसांना तेल लावून हळुवार हाताने मॉलिश केल्याने चांगली झोप येते.