* त्वचा उजळ व कांतिमान बनवण्यासाठी मध, अंड्यातील पांढरी सफेदी व गाजराचा रस (सर्व अर्धा टी स्पून) एकत्र करून त्याची पेस्ट चेहर्यावर लावावी. 15 मिनिटाने चेहरा धुवावा.
* त्वचा काळपट पडली असल्यास लिंबू व काकडी यांचा रस एकत्र करून कापसाने चेहर्यावर लावावा.
* चेहर्यावर सुरकुत्या पडत असतील तर बटाटा किसून त्याचा रस पिळून घ्या. त्यात मुलतानी माती व थोडं मध मिसळून लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा उपयोग करा.
* चेहर्यावरील डाग घालवण्यासाठी मेथीची पाने वाटून त्याचा रस काढून चेहर्यावर लावा. रोज उपयोग केल्यावर डाग नाहीसे होतील. सतत सात दिवस लिंबाची साल चोळण्याने पण डाग कमी होतात.
* हळद व लिंबाचे मिश्रण नियमितपणे चेहर्यावर लावण्याने ग्लो येतो.
* मुरूमे घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्यावर चोळावी. याने पुटकुळ्या, काळी वर्तुळे, डाग दूर होण्यास मदत मिळते. हा उपाय तीन दिवस तरी करावा.
* तारुण्यपीटिका कमी करण्यासाठी चेहर्यावर बाजरीच्या पीठाचा लेप लावावा.
* त्वचा निखारण्यासाठी बेसन, हळद, दूध, थोडंसं मीठ, आणि बदाम किंवा खोबरेल तेलाचे 5-6 ड्राप्स टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावावी. 3-4 दिवसात ही पेस्ट लावण्याने त्वचा तजेलदार होते.