Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 12 April 2025
webdunia

चकचकीत त्वचा मिळविण्यासाठी या ब्युटी ड्रिंकचे सेवन करा

Drink this beauty drink to get glowing skin beauty tips beauty care drinks to get glowing skin tips in marathi  glowing skin beauty drink beauty tips in marathi webdunia marathi
, शनिवार, 6 मार्च 2021 (08:30 IST)
निर्दोष त्वचा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्षित करत असतो त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ते आहे चमकणारी त्वचा मिळविण्याचे नैसर्गिक मार्ग. एक पौष्टिक आहार आपल्या शरीराला आतूनच नव्हे तर बाहेरून देखील निरोगी ठेवतात. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी भाज्या आणि फळांचे रस देखील प्रभावी आहे. 
ज्यूस देखील आपल्या त्वचेला चमक देण्यात मदत करतात कसं काय चला जाणून घेऊ या. 
बऱ्याच भाज्या आणि फळांमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात. त्वचेला केसांच्या आरोग्यावर परिणाम करणारे विषारी टॉक्सिन बाहेर काढण्यात मदत करतात. या मध्ये अँटी ऑक्सिडंट आढळतात. पौष्टिक भाज्या आणि फळांचा रस घेऊन आपण तजेल त्वचा सहज मिळवू शकता. 
 
* गाजर आणि बीटरूटचा  रस-
गाजर आणि बीटरूटचा रस हा त्वचेसाठी अमृत आहे. कसं काय , तर बीटरूटमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. त्याला पॉवर पॅक असे ही म्हणतात. हे रक्ताला शुद्ध करण्याचे काम करते. बीटरूटचा रस नियमितपणे घेतल्याने त्वचा चमकदार आणि डाग मुक्त मिळते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आढळते जे मुरूम, सुरकुत्या आणि टॅनिग दूर करण्यात मदत करते. 
 
* काकडीचा रस- 
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस प्रभावी आहे.हे त्वचेला मॉइश्चराइझ करण्यात मदत करते. या मुळे त्वचा डागमुक्त दिसते. हे त्वचे ला हायड्रेट करण्यात मदत करतो. या मुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. 
 
* ताजे टोमॅटोचा रस- 
टोमॅटो हे अँटीऑक्सीडेंट ने समृद्ध आहे. वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यात मदत करते. जसे की सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात. त्वचा टॅनिग झाली असल्यास टोमॅटो चा रस खूप उपयुक्त आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा