खराब दर्जाचा मेकअप वापरल्यास रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. मेकअप रात्री स्वच्छ न केल्याचेही वाईट परिणाम होतात.
पिंपल्स आलेल्या त्वचेवर ते लपवण्याच्या उद्देशाने हेवी मेकअप करणे टाळावे. पिंपल्स ही मेडिकल कंडिशन आहे. त्वचाविकारतज्ज्ञाकडून त्यावर इलाज करून घ्यावा. पिंपल्स आल्यास उन्हात थेट जाणे टाळावे. सिटील अल्कोहल किंवा सॅलिसिलिक अॅसिड क्लिन्झरचा वापर करावा. पिंपल्स आणखी वाढवणारे साखर आणि दुधाचे पदार्थ जेवणातून तात्पुरते वगळावेत. लाल आणि केशरी रंगांच्या फळांचा आणि भाज्यांचा जेवणातील वापर वाढवावा.
* दररोज रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढावा. चेहर्याला नॉन ऑईल बेस मॉइश्चरायझर लावून मगच झोपावे.
* लाईट आणि मॅट फिनिशचा मेक अप अधिक वापरावा. त्यामुळे त्वचेचे रक्षण होते आणि रंध्रे बुजत नाहीत.
* मेक अप काढल्यानंतर झोपण्यापूर्वी नॉन ऑईल बेस मॉइश्चरायझर लावावे.
* दिवसातून दोनदा तरी त्वचेला मॉइश्चराईज करावे.
* मेकअप काढण्यासाठी क्लिनझिंग मिल्कचा वापर करावा.
* हेवी मेक अप केल्यानंतर कडक उन्हात जाणे टाळावे.