Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dry केस होतील Soft आणि Shiny

Dry केस  होतील Soft आणि Shiny
, मंगळवार, 11 एप्रिल 2023 (15:29 IST)
केसांना धुतल्यावर हाताळणे फार कठीण असतं. कारण ते निर्जीव आणि रुक्ष दिसू लागतात आणि भरकटलेले दिसतात. अशामुळे त्याचे सर्व लुक खराब होतं. जर आपल्याला देखील अश्या परिस्थितीतून जावे लागत असल्यास, तर हे काही टिप्स आपल्या कामी येऊ शकतात. 
 
केसांना टॉवेलने पुसू नये - 
केसांना धुतल्यावर जर आपली केसांना टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवण्याची सवय आहे तर ही सवय आजच मोडून टाका. कारण ही सवय आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. जर का आपल्याला केस वाळवायचे असल्यास सूती कपड्याने वाळवून घ्या. टॉवेलमध्ये कडक तंतू असतात ज्यामुळे ते केसांना राठ आणि निर्जीव बनवून देतात. 
 
जर आपणास पाहिजे की शॅम्पूने केस धुतल्यावर असे भरकटलेले वाटू नये त्यासाठी केसांना लिव्ह इन कंडिशनर लावावे. अश्या प्रकारच्या कंडिशनरमुळे केसांना पोषण मिळत. त्याच सह हे रेशीम दिसू लागतात. सामान्य कंडिशनर केसांमधून धुतल्या गेल्यावर देखील त्याचा परिणाम कमी होऊ लागतो. 
 
केसांना मऊ आणि रेशीम बनविण्यासाठी शॅम्पू केल्यावर तेलाच्या ऐवजी सीरम वापरावं. हे आपल्या रुक्ष आणि राठ केसांना मऊ करण्यात मदत करतात. जर आपल्या डोक्यावर नवे वाढ होणारे बेबी केस असतील आणि त्यांना खाली बसविण्यासाठी बऱ्याच युक्त्या अपयशी ठरतात. आपल्याला हे सेट करावयाचे असल्यास टूथब्रशवर हेयर स्प्रेची फवारणी करून आपल्या केसांना सेट करावं.
 
केसांना नैसर्गिकरीत्या गुळगुळीत आणि रेशीम करण्यासाठी हेयर स्पा महत्त्वाचे आहे. घरात किंवा पार्लरमध्ये जाऊन आपण केसांना मऊ आणि रेशीम बनवू शकता. बरेच घरगुती हेयर पॅक असे बनवले जातात ज्यांचा साहाय्याने राठ केसांवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Healthy liver: या गोष्टी तुमचे लिव्हर खराब करत आहेत, आजपासून त्यांचे सेवन करणे बंद करा