आधारीत असल्याने येथे बुद्धिबळ बोर्ड व तलवार ठेवण्यात आली आहे. यामुळे मेसॉन विविध रेखाकृती बनवतात, निरनिराळे कपडे व दागिने घालतात. यासोबतच त्यांची बसण्याची पद्धतही एकदम हटके आहे. त्यांची चर्चा शास्त्रशुद्ध पद्धतीने होते, मात्र सामान्य माणसास याचा बोध होणे कठीण आहे. सॉलोमन राजाच्या काळात येथे मृत्युदंडासारख्या शिक्षाही देण्यात आल्या आहेत. यामुळे येथे लोकांच्या रडण्याचे आवाज येत असतात व त्यामुळे लोकांमध्ये मेसॉनिक काळी जादू करत असल्याचा गैरसमज पसरला आहे. मेसॉन बंधुत्वावर विश्वास ठेवतात. प्रत्येक मेसॉनने सोसायटीच्या सदस्यास मदत करणे यात अभिप्रेत आहे. निर्मितीसंबंधी विविध अवजारे त्यांच्याकडे असतात. चिन्ह, संकेत, अवजारांमुळे त्यांच्या सोसायटीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अवजारांबाबत त्यांना विचारले असता, प्राचीन काळात घरे बांधण्यासाठी मेसॉन्सने याचा उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जगभरात सुमारे 240 मेसॉनिक लॉजेस आहेत. स्कॉटलंड येथे त्यांचे मुख्यालय असून ते एकमेकांशी जोडलेले असून त्यांच्या नियम व कायद्यांचे पालन करतात. प्रत्येक लॉजला क्रमांक असते. महू येथील लॉजला क्रमांक आहे - 389 (sc). मेसॉनिक सोसायटीबाबतच्या रहस्याचा भेद येथे करण्यात आला आहे, मात्र, अजूनही बर्याच गोष्टी रहस्याआड दडल्या आहेत. या सोसायटीबाबत आपणास काय वाटते?