केंद्रीय कर्मचाऱ्यांना ई-रिटर्नद्वारे आपली संपत्ती आणि त्याबाबची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र यात शिपाई वर्गातील कर्मर्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.
लोकपाल कायद्यान्वये केंद्रीय कर्मचार्यांना रिटर्न भरणे आवश्यक आहे, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वच केंद्रीय कर्मचार्यांना स्वत:बरोबरच पत्नी, त्याच्यावर अवलंबून असलेल्या मुलांची संपत्ती आणि देणे याबाबतचा तपशील द्यावा लागणार आहे. विभागाने लोकसेवक नियम २०१४ नुसार मागच्याच महिन्यात अधिसूचना जारी केली होती.