केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी सुविधा करापोटी काही उत्पादनांवर विशेष अधिभार लावण्यात येणार आहे. त्यापैकी एक म्हणजे दारूवर 100 टक्के सेस लावण्यात येणार आहे. कृषी सुविधा विकास कर नावाने हा अधिभार लावण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा विकासासाठी अल्कोहोलिक पेयांवरची बेसिक कस्मट ड्युटी कमी करून हा सेस वाढवल्यामुळे ग्राहकांवर थेट ओझं पडणार नाही याची तरतूद केलेली आहे.
विदेशी दारुच्या वेगवेगळ्या प्रकारांवर 100 टक्के कृषी अधिभार लावण्यात येईल.