Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

डॉक्टर आणि नर्स यांना हवाई तिकीटात २ टक्के सवलत

2% discount
, शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:16 IST)
कोरोनाच्या या कठीण प्रसंगात डॉक्टार आणि नर्स मोठ्या हिंमतीने काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने  जाहीर केले की, २०२० च्या अखेरीस ते डॉक्टर आणि परिचारिकांना हवाई तिकीटात २ टक्के सवलत देणार आहेत. एअरलाइन्सने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, “परिचारिका व डॉक्टरांनी आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून तपासणीच्या वेळी रुग्णालयाचा वैध आयडी दाखवणे गरजेचे आहे. इंडिगोने या योजनेला ‘टफ कुकी’ अभियान असे नाव दिले आहे.
 
इंडिगोने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, इंडिगो वेबसाइटवरून तिकीट काढताना सवलत दिली जाईल. ही सूट १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या प्रवासासाठी दिली जाईल.
 
नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी ट्विटरवर सांगितले की १ जुलै रोजी ७१,४७१ प्रवाश्यांनी ७८५ विमानात प्रवास केला. याचाच अर्थ बुधवारी सरासरी ९१ प्रवाश्यांनी विमानात प्रवास केला. सामान्यत: वापरल्या जाणार्‍या ए ३२० विमानात जवळपास १८० जागा असल्याने १ जुलै रोजी प्रवाशांची संख्या जवळपास ५० टक्के होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता कोरोनापासून बचाव करेल नेकलेस, नासाने तयार केला अनोखा हार