लक्ष्मी विलास बँकेच्या डीबीएस बँक इंडियामध्ये विलनीकरणाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायलयाने नामंजूर केली.
27 नोव्हेंबरपासून विलगीकरण प्रक्रिया सुरु होणार आहे. या विलनीकरणाला बँकेच्या प्रमोटर्सने हायकोर्टात आव्हान दिले असून विलनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायलयाने दिलासा देण्यास नकार देत मागणी फेटाळून लावली.
आरबीआयने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँकेत विलनीकरण करण्याचे आदेश दिले असून मंत्रीमंडळाने तसा निर्णयही घेतला आहे.
न्यायलयाने विलनीकरण स्थगिती देण्यास नकार दिला मात्र याचिकेत उपस्थित मुद्यांवर आरबीआयने खुलासा करावा, असे निर्देश दिले. तसेच याचिकादारांना बाजू मांडण्यास सांगितले. पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे.