Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Cloth-Shoes Price Hike: कपडे आणि चपला नवीन वर्षांपासून महागणार

Cloth-Shoes Price Hike: कपडे आणि चपला नवीन वर्षांपासून महागणार
, शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (09:45 IST)
नवीन कपडे आणि चपला घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक असेल कपडे आणि चपला येत्या नवीन वर्षापासून महाग होणार
जर आपल्याला  नवीन कपडे आणि शूज खरेदी करण्याचा शौक असेल तर  माहिती असू  द्या  की 1 जानेवारी 2022 पासून नवीन वर्षापासून कपडे आणि चपलांच्या किमती वाढू शकतात. जीएसटी कौन्सिलकडून कपडे आणि फुटवेअर उद्योगाच्या इनव्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलानंतर कपडे आणि बुटांच्या किमतीत थोडी वाढ होणार आहे.
कापड आणि बूट उद्योगाशी संबंधित लोक बऱ्याच  काळापासून संरचनेत बदल करण्याची मागणी करत आहेत. या क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, शूज बनवण्यासाठी कच्च्या मालावर12 टक्के आणि तयार वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आहे.
हा तोटा भरून काढण्यासाठी कच्च्या मालाच्या किमतीवर5टक्के आणि महागड्या शूजवर 18 टक्के जीएसटी आहे. जानेवारीपासून कपड्यांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. 
माहितीनुसार, सध्या MMF फॅब्रिक सेगमेंटमध्ये (फायबर आणि यार्न) इनपुटवर 18 टक्के आणि 12 टक्के जीएसटी आकारला जातो. MMF फॅब्रिकवर जीएसटीचा दर पाच टक्के आणि तयार वस्तूंवर पाच टक्के आणि 12 टक्के आहे. परिणामी, आऊटपुटपेक्षा इनपुटवरील जीएसटी जास्त आहे. अशाप्रकारे, कपडे आणि चपलांवरील कररचनेत बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ९६३ नवीन कोरोनाबाधित