Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Edible Oil Price : खाद्यतेल आणखी स्वस्त होणार !

edible oil
, मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (14:35 IST)
वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमोडिटीच्या किमतीबाबत मंगळवारी आयएमसीची (IMC) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत  एमआरपी, तेलबियांचा स्टॉक लिमिट यावर फेरविचार करण्यात येणार आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 
 
तेल कंपन्या लवकरच तेलाच्या किंमती कमी करण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या बाबतीत पुन्हा सुखद दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी आयएमसीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे .एमआरपी, स्टॉक मर्यादेचा पुनर्विचार केला जाईल. या बैठकीत पाम तेलाच्या भविष्याबाबत उद्योग सादरीकरणावरही चर्चा होऊ शकते.
 
परदेशी बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत घसरण होऊ शकते. घसरलेल्या किमतींचा फायदा घरगुती ग्राहकांनाही व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
 
सणासुदीच्या काळात वस्तूंच्या किमती वाढू नयेत, हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी बाजारात पुरेसा साठा उपलब्ध असायला पाहिजे. या बैठकीत गव्हाच्या आयातीवरील शुल्क कमी करण्यावरही विचार केला जाणार आहे. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA : FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केले