Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोने ७० हजारांवर जाणार गाठली विक्रमी पातळी

gold
, शनिवार, 9 मार्च 2024 (12:24 IST)
सोने खरेदी करणा-यांसाठी निराशाजनक बातमी असून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सोन्याचा दर हा जीएसटीसह ६६,८०० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर हे ७० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील दोन दिवसात जवळपास सोन्याच्या दरात अडीच हजारांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागले आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षेने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
 
गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तब्बल २८०० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर हे ६६८०० रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. वाढत्या दरात सोने ग्राहकांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र जळगाव सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यास सुरु केल्याने, सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसात १० ग्रॅम सोन्याच्या मागे तब्बल दोन हजार आठशे रुपयांची वाढ तीन दिवसात झाली आहे. सोन्याचे दर हे ६४८०० तर जीएसटीसह ६६८०० रुपयांच्या वर जाऊन पोहोचली आहे.
 
सोने ७० हजारांवर जाणार
जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याच्या दरात तीन दिवसांत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे दर जीएसटीसह ६४१०० होते तेच सोन्याचे दर आज तब्बल ६६८०० इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. आजवरचे सोन्याचे दर हे सर्वाधिक उंचीवर असल्याचे सोने व्यावसायिकांनी सांगितले आहे. आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढ होऊन ७०००० हजार रुपयांच्यापर्यंत जाण्याची शक्यता सोने व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.
 
Edited By- Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांचा नातू रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, 50 कोटींचा साखर कारखाना जप्त