नोटाबंदीच्या निर्णयामुळे मागच्यावर्षी अर्थात 2016 मध्ये सोन्याच्या मागणीमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली. सोन्याची मागणी सातवर्षांच्या नीचांकी पातळीला पोहोचली होती. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये भारताकडून 675.5 टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली. तर 2015 मध्ये भारताने 857.2 टन सोन्याची मागणी नोंदवली होती. 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये 21.2 टक्के सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली.
भारतीय ग्राहकांनी कमीत कमी सोने खरेदी करावी यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात आली त्याचाही सोने खरेदीवर परिणाम झाला. सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती, उत्पादन शुल्क कर, नोटाबंदी तसेच उत्पन्न जाहीर करण्याच्या योजना या सर्वाचा सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला.