Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीचे भाव जाणून घ्या

सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीचे भाव जाणून घ्या
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (18:30 IST)
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर, चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. अशा परिस्थितीत, जर आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आपल्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भावात आज 0.25 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर, चांदीचे भाव 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
 
 सोन्या-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या -
एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरून 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज चांदी 0.01 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,351 रुपये आहे.
 
रिकॉर्ड हाईपेक्षा 8,400 रुपये स्वस्त आहे
वर्ष 2020बद्दल बोलायचे झाले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,400 रुपयांनी स्वस्त आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

U19 World Cup 2022: भारताचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना