Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाफेडकडून पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार

onion
, बुधवार, 24 मे 2023 (21:06 IST)
नाशिक : प्रतिनिधी 
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत पडत आहेत. कांद्याच्या भावात होणारी घसरण न थांबल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जातील अशी भिती व्यक्त करत कांदा खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना वजा आदेश खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, नाफेडकडून पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आहे.
 
मागील गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे.जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असून शेतकऱ्यांना हवा तसा बाजारभाव मात्र मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी साडे तीनशे तर जास्तीत जास्त एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे.आज मितीस शेतकऱ्यांना सरासरी साडे सहाशे रुपये इतकाच भाव कांद्याला मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  गोडसे यांची भेट घेत कांद्याला मोठी भाववाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.
 
खासदार हेमंत गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला. शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मिळणारा कमी भाव यापुढे काही दिवस मिळत गेला तर कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत नोटीस जातील अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिकाधिक भाव मिळण्यासाठी नाफेड मार्फत तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशा सूचना वजा आदेश यावेळी खासदार गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिल्या. नाफेड मार्फत नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी होणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याची ग्वाही यावेळी नाफेडचे पठाडे यांनी दिल्या.
Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा घणाघात