Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

एप्रिलपासून ऑनलाइन पीएफचे पैसे काढता येणार

एप्रिलपासून ऑनलाइन पीएफ
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) सदस्य एप्रिल २०१७पासून ऑनलाइन पीएफचे पैसे काढू शकतात. यासाठी स्वतःच्या कंपनीत किंवा कार्यालयात पैसे काढण्याचा फॉर्म भरण्याची गरज नाही. या फायदा १७ कोटी सदस्यांना होणार आहे.  ईपीएफओ ऑनलाइन पीएफ काढण्यावर काम करत असल्याची माहिती हाती आली आहे.

ईपीएफओच्या कार्यालयांना सॉफ्टवेअरद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन एप्रिलपासून ऑनलाइन पीएफ काढण्यास सुरूवात होण्याची दाट शक्यता आहे. ऑनलाइन सेवा सुरु झाली की ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन  पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सध्या पीएफ काढण्यासाठी पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तो कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटकडे जमा करावा लागतो. नंतर तो फॉर्म ईपीएफओ कार्यालयात जातो, या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्यामुळे ऑनलाइन ऑपशन चांगला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन तेंडुलकरने डोणजा गाव दत्तक घेतले