Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा टेलिसर्व्हिसेसला लागणार टाळे?

टाटा टेलिसर्व्हिसेसला लागणार टाळे?
मुंबई , शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:03 IST)
दूरसंचार संस्थेतील वाढती स्पर्धा पाहता ‘टाटा’ला यामध्ये टिकून राहणं कठीण होत आहे. त्यामुळे १४९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच टाटा टेलिसर्व्हिसेस बंद करण्याचा निर्णय कंपनी घेण्याच्या तयारीत आहे.
टाटा टेलिसर्व्हिससोबत ‘डोकोमो’ या जपानी कंपनीची २६ % भागीदारी आहे. दिवसेंदिवस अनेक टेलिकॉम कंपन्या दूर संचार क्षेत्रात उतरल्या आहेत. यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. सतत होणारे नुकसान पाहता स्वबळावर टिकून राहणं टाटाला यापुढे कठीण होत आहे.
टाटाकडे सुमारे ३४००० कोटीचे कर्ज आहे. टाटाने  टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम फेडणं शक्य होणार आहे. त्यामुळे टाटा अशाप्रकारचा विचार करू शकते. पण अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती टाटाकडून दिली जात आहे. मोबाईल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसने भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली होती, मात्र यामध्ये त्यांना यश आले नसल्याने कंपनीसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी आपल्या वाढदिवशी करणार या धरणाचे उद्घाटन