Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन 'या' ठिकाणी तयार

देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन 'या' ठिकाणी  तयार
, मंगळवार, 8 मार्च 2022 (17:52 IST)
सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनता हैराण झाली आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करून ही समस्या टाळता येऊ शकते. अशा परिस्थितीत ही वाहने चार्ज करण्यासाठी गुरुग्राममध्ये देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे.

या चार्जिंग स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे की इथे चार्जिंगसाठी 121 पॉईंट्स देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे की या ठिकाणी 24 तासात 1000 हुन अधिक वाहने चार्ज करता येणार.
हे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन गुरुग्रामच्या सेक्टर 86 मध्ये बांधण्यात आले आहे. 
इलेक्ट्रिक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गा एनएहीव्ही ने 75 AC, 25 DC आणि 21 हायब्रीड चार्जिंग पॉइंट्ससह 24 तासांत 1000 इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याची क्षमता असलेले हे भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन बांधले आहे.
या स्टेशन वर एकूण 121 चार्जर बसवण्यात आले आहेत, हे स्टेशन  24 तासांत 1000 इलेक्ट्रिक कार चार्ज करू शकते आणि 100 वाहने एकाच वेळी चार्ज करू शकतात. 
 
एनएचइव्ही वर्किंग ग्रुपचे सदस्य आणि इलेक्ट्रीफाई स्टेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार म्हणाले की, एसी चार्जर 6 तासात कार पूर्णपणे चार्ज करतो आणि दिवसभरात अशी 4 वाहने चार्ज करतो. आमच्याकडे असे 95 चार्जर आहेत जे दिवसभरात 570 वाहने नॉन-स्टॉप चार्ज करू शकतात. तर DC फास्ट चार्जर एका तासात कार आरामात चार्ज करू शकतो आणि 24 तासात 24 कार चार्ज करू शकतो. आणि असे 25 चार्जर आहेत जे एका दिवसात 600 इलेक्ट्रिक कार जलद चार्ज करू शकतात. 

पेट्रोल पंपांना टक्कर देण्यासाठी ही चार्जिंग स्टेशन्स बनवण्यात आली आहेत. कारण 24 तासांत 1000 आणि 576 कार चार्ज करू शकतील
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदुरीकर महाराज : 'माझे व्हीडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांचं वाटोळं होईल'