पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अर्थात PMC बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे (RBI) निर्बंध आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आले आहेत.
1 जुलै 2021 पर्यंत PMC बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. आता त्यात वाढ करून, 31 डिसेंबर 2021 पर्यंत हे निर्बंध कायम असतील.
पीएमसीची स्थापना 1984 साली मुंबईतील सायन इथं झाली. या बँकेच्या सहा राज्यांमध्ये मिळून 137 शाखा आहेत. बँकेच्या महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही शाखा आहेत.
24 सप्टेंबर 2019 पासून पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीअंतर्गत आणण्यात आली आहे. तसंच बँकेवर अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत.
बँकेवर निर्बंध लादल्यानंतर RBI नं खातेधारकांना एकावेळी 1 हजार रुपयेच काढता येतील असं म्हटलं होतं. त्यानंतर ही मर्यादा वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली होती.