Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अग्निहोत्र 2’ प्रेक्षकांचा निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली

'अग्निहोत्र 2’  प्रेक्षकांचा  निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:28 IST)
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका  लवकरच निरोप घेत आहे. दहा वर्षांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.  त्याच पार्श्वभूमीवर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र 2’ मालिका 2 डिसेंबर 2019 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, प्रेक्षकांचा या नव्या पर्वाला प्रतिसाद न मिळाल्याने टीआरपीमध्ये ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा नर्णय घेतला.
 
‘अग्निहोत्र 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. विशेष म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत या मालिकेमार्फत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. .
 
‘अग्निहोत्र 2’ मालिकेचा शेवटचा भाग येत्या 9 मार्चला प्रसारित होणार आहे. त्यानंतर ‘वैजू नंबर 1’ ही मालिका सुरु होणार आहे. मालिका सुरु झाल्यानंतर दोन महिन्यातच ही मालिका बंद होत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक पन्हाळा किल्ला एक थंड हवेचे ठिकाण