Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) जिओ स्टुडिओजचा मराठी चित्रपट "गोदावरी”ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

Webdunia
बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (14:50 IST)
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल(SCO) मध्ये तब्बल १४ चित्रपटांपैकी सर्वोत्तम चित्रपट म्हणून जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपट गोदावरी ची निवड करण्यात आली आहे. 
 
मुंबई मध्ये २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मोठया दिमाख्यात पार पाडलेल्या या महोत्सवात भारतातील नामांकित सिनेमांची वर्णी लागली होती आणि त्यात गोदावरी या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळणे ही गौरवशाली बाब आहे.
 
 मा. श्री. प्रसून जोशी आणि श्री. आर माधवन यांच्या हस्ते गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. निखिल महाजन आणि जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड श्री. निखिल साने यांना हा पुरस्कार  सोपवण्यात आला. ह्या गौरवशाली सोहळ्यात चित्रपटाचे नायक जितेंद्र जोशी, नायिका गौरी नलावडे आणि टीम उपस्थित होती.
चित्रपटाबद्दल सांगायचे तर ११ नोव्हेंबर २०२२ ला सिनेमागृहांमधे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक फिल्म समीक्षक, मराठी सेलिब्रिटी आणि प्रेक्षक यांनी या सिनेमाचे प्रचंड कौतुक केले होते. तसेच या सिनेमाने प्रदर्शनाच्या आधीच परदेशातील अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी वन नाईट स्टँडपासून सुरू झाली

पुष्पा 2 रश्मिका मंधाना बनली भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

रेल्वे म्यूजियम दिल्ली

एजाज खानच्या घरातून सीमाशुल्क विभागाने जप्त केले ड्रग्ज, अभिनेत्याच्या पत्नी फॅलन गुलीवालाला अटक

पुढील लेख
Show comments