Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा वाद, तर कुठलाच टायगर वाचु शकणार नाही : राणे

पुन्हा वाद, तर कुठलाच टायगर वाचु शकणार नाही : राणे
हिंदी सिनेमांमुळे मराठीला थिएटर्स मिळत नसल्याचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या शुक्रवारी सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शित होत असून मराठीतील अंकुश चौधरीचा 'देवा' हा सिनेमा रिलिज होणार आहे. 
 
टायगरमुळे देवा या सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे देवाच्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतली आहे. आता मनसे पाठोपाठ नितेश राणे यांनी देखील सिनेमाला समर्थन दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थियटरस ना कुठलाच टायगर वाचु शकणार नाही!!  महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे!!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिंकू आता मकरंद मानेच्या 'कागर' मधून भेटीला