Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवरायांच्या अपमान केल्यावरून वाद, रितेश देशमुखने फोटो काढून मागितली माफी

शिवरायांच्या अपमान केल्यावरून वाद, रितेश देशमुखने फोटो काढून मागितली माफी
अभिनेता रितेश देशमुखने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर चढून फोटो काढल्याने शिवप्रेमी भडकले. रितेशने शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून चौफेर टीका होऊ लागली. या टीकेनंतर रितेशने जाहीर माफी मागितली आहे.
 
रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘छत्रपती शिवाजी’च्या निमित्ताने नुकतीच रायगडाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपतींची शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर चढून फोटो काढले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियावर लगेच टीका होऊ लागली. काही तरी चुकलं हे लक्षात येताच रितेशने ते फोटो सोशल मीडियावरून हटवत माफी मागणारी पोस्ट शेअर केली आहे.
 
रितेशचा माफीनामा
‘आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं गेलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो’.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...