Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'लेक माझी लाडकी' मध्ये सुनील बर्वे वेगळ्या अंदाजात

sunil barve
, मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (15:07 IST)
संपूर्ण महारष्ट्राला नात्यांच्या एका वेगळ्या प्रवाहात घेऊन जाणाऱ्या स्टार प्रवाह वरील 'लेक माझी लाडकी' या मालिकेत महत्वाचे वळण आले आहे. आई आणि मुलीच्या नाजूक नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेमध्ये मराठीचा चिरतरुण अभिनेता सुनील बर्वे वेगळ्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. ऐश्वर्या नारकर यांनी साकारलेल्या इरावती सुभेदार यांच्या भूतकाळातील पुरुष बनून सुनील बर्वे या मालिकेत वर्णी लावणार आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेद्वारे सुनील बर्वे पुन्हा एकदा एक गायक म्हणून लोकांसमोर येणार आहेत. मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर सुनील यांनी अभिनेता म्हणून ओळख कमावली असली तरी ते गायक देखील आहेत, याचा प्रत्यय 'लेक माझी लाडकी' या मालिकेत लाक्वरच पाहायला मिळेल. 
 
सारेगमप मधून नावारूपास आलेले सुनील बर्वे यांची अभिनय कारकीर्द मोठी आहे. यापूर्वी सुनील यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज देखील दिला आहे, त्यांचा हा गोड आवाजांचा पुन्हा एकदा आस्वाद घेण्याची नामी संधी 'लेक माझी लाडकी' या मालीकेमाधीन रसिकांना मिळणार आहे, स सुनील बर्वे यांची .... भूमिका असून, .... यांचे इरावातीच्या आयुष्यात पुन्हा यायचा हेतू काय आहे हे पाव्हणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुमार सानू यांचे "हलके हलके" बोल...