मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले.ते 67 वर्षाचे होते. ते विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. ते त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे,त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या.ते कर्करोगाशी झुंजत होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.
विजय कदम हे मराठी चित्रपटश्रुष्टीतील सक्रिय अभिनेता होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वात एक हुरहुन्नरी कलाकार गमावला आहे.
त्यांनी नाटकांसह जाहिरातींमध्ये काम केले होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी रिषभ पंतसह एका जाहिरातीत काम केले होते. त्यांनी 1980 -90 च्या काळात केलेल्या विनोदी भूमिका गाजल्या. त्यांनी पप्पा सांगा कोणाचे, सही दे सही, टुरटुर, विच्छा माझी पुरी करा सारखे नाटक केले. आणि आपल्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले. त्यांचा निधनाने मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.