Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उमेश-तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप

उमेश-तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप
, मंगळवार, 3 एप्रिल 2018 (11:56 IST)
सिनेमातील कलाकार कितीही मोठे असले तरी त्यांना नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकण्याची किंवा आपल्या गुणात आणखीन भर करण्यासाठी इच्छा असते. आपल्या अभिनय कौशल्यात ज्ञानाची अधिक भर घालण्यासाठी काही अभिनेते वर्कशॉपचा आधार घेतात. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीने सुध्दा अलीकडेच काही खास वर्कशॉप जॉइंट केले होते. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात उमेश आणि तेजश्री या दोघांची भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे त्यांनी काही विशेष वर्कशॉप केले.
 
चित्रपटात अनेक छान गाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत यातले ‘यु नो व्हॉट?’ह्या कवितेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात उमेशने पहिल्यांदा गिटार वाजवली आहे. त्याने गिटारचे प्रशिक्षण हे अद्वैत पटवर्धनकडून घेतले. ऑनस्क्रीन उमेशला गिटार सुलभ हाताळता यावी यासाठी अद्वैतनेदेखील चोख मार्गदर्शन केले होते.
 
तेजश्री प्रधान या सिनेमात एका आर. जे. ची भूमिका करते आहे. यासाठी तिने सुध्दा खूप मेहनत घेतली तिने आर. जे.चे खास एक महिना प्रशिक्षण घेतले. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा संवाद, शब्दोच्चार, हजरजबाबीपणा आणि मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्रीने जवळून न्याहारल्या. तिने एका रेडीओ स्टेशनला भेटदेखील दिली. आर. जे. किरणच्या व्यक्तीरेखेत चोख बसण्यासाठी तिने आर. जे.च्या कामाचे निरीक्षण करत त्यांच्याशी संवाद साधून काही टिप्स घेतले. उमेश-तेजश्रीने यापूर्वी 'लग्न पहावे करून' या चित्रपटातून एकमेकांसोबत काम जरी केले असले तरी, त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री दाखवणारा 'असेही एकदा व्हावे' हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती मधुकर रहाणे यांनी केली आहे आणि त्यांना रवींद्र शिंगणे यांनी सुद्धा साथ दिली आहे. उन्हाळी सुट्टीत प्रेमाचा थंडावा घेऊन येणारा हा चित्रपट सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरेल हे नक्की!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेक्षकांना भावतोय साऊथचा तडका