ऑस्ट्रेलियाकडे सर्वोत्तम गोलंदाज : सेहवाग
अॅडलेड , मंगळवार, 24 जानेवारी 2012 (12:14 IST)
प्रतिस्पर्ध्यांची गोलंदाजी उद्ध्वस्त करण्यात तरबेज असणारा भारताचा स्फोटक फलंदाज आणि हंगामी कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने कांगारूंचे विद्यमान गोलंदाज सर्वश्रेष्ठ असून त्यांनी आमच्या संयमाची कठोर परीक्षा घेतली असल्याचे मत, सोमवारी चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर एका सामन्याची बंदी घालण्यात आल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटीत सेहवाग भारताचे नेतृत्व करणार आहे. त्याने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला बोलताना ऑस्ट्रेलियाचे सध्याचे गोलंदाज सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांनी आमच्या धीराची परीक्षा घेतली. आम्हाला मोकळेपणाने फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. चार कसोटींच्या या मालिकेत भारताने यापूर्वीच 0-3 असा पराभव पत्करला आहे. अॅडलेडच्या मैदानावर आजपासून सुरू होणार्या चौथा समाना जिंकून किमान आपली प्रतिष्ठा राख्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने भारताला व्हाईटवॉश दिल्याशिवाय समाधान मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.