न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा झाली असून एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी फलंदाज सुरेश रैनाचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
जूनमध्ये झालेल्या झिंबाब्वे दौर्यात विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि अमित मिश्रा यांना विश्रांती देण्यात आली होती. या चौघांचेही पुनरागमन झाले आहे. तसेच, आर. आश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या टीम इंडिया देशात 11 कसोटी खेळणार आहे. म्हणून भविष्यातील सामने लक्षात घेत आश्विन, जडेजा आणि शमीला पहिल्या तीन सामन्यांत विश्रांती देण्यात आली आहे. तसेच कसोटी मालिकेत धवन, राहुल आणि भुवनेश्वर हे जखमी झाले होते.