जमैका कसोटीत भारताने पहिल्या डावात 9 बाद 500 धावांची मजल मारुन विंडीजवर 304 धावांची आघाडी घेतली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियाचा विजय आणखी लांबणीवर पडला आहे.
चौथ्या दिवशी केवळ 15 षटकं आणि पाच चेंडूंचाच खेळ होऊ शकला. विंडीजची अवस्था चार बाद 48 अशी झाली असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अजूनही 256 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी विंडीजच्या सहा विकेट्स काढण्याचं आव्हान असेल. चौथ्या दिवसाचा खेळ उशिराने सुरु झाला होता. मोहम्मद शमीनं दोन, तर ईशांत शर्मा आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट काढली.