Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अश्विन यंदाच्या वर्षात धोनी आणि विराटलाही मागे टाकणार!

अश्विन यंदाच्या वर्षात धोनी आणि विराटलाही मागे टाकणार!
भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन ‍अश्विन 2016 मधील उल्लेखनीय कामगिरीनंतर यंदाच्या वर्षात देखील दमदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान, अश्विन जाहिरात विश्वात देखील धोनी आणि विराटलाही यंदा मागे टाकण्याची शक्यता आहे. अश्विन लवकरच एका कंपनीसोबत करार करणार असून या करारानंतर तो सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त करेल.

अश्विन यंदाच्या वर्षाच्या अखेरीस देशातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर असेल, असा दावा आयटीडब्ल्यू ब्लिजट्जे सह- संस्थापक भैरव सनत यांनी केला आहे.
 
आयटीडब्ल्यू ब्लिट्ज कंपनी अश्विनकडून यंदाच्या वर्षात 15 ब्रँड्सची जाहिरात करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घ्या अवघ्या 8.35% व्याजदराने गृहकर्ज