Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोंबिवलीत मराठी माणसाला बंदी

डोंबिवलीत मराठी माणसाला बंदी
, बुधवार, 4 मार्च 2020 (10:33 IST)
डोंबिवलीत क्रिकेट स्पर्धेत मराठी भाषिकांना नो एन्ट्री असे धक्कादायक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. डोंबिवलीच्या युवा आशापुरा मित्र मंडळानं यंदा पहिल्यांदाच नमो रमो ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा भरवली आहे. त्यांच्या बॅनरवर या स्पर्धेत फक्त गुजराती, कच्छी आणि मारवाडी खेळाडूच सहभागी होऊ शकतील असे स्पष्ट अंकित केले गेले आहे.
 
हे पोस्टर व्हॉट्सपवर प्रचंड व्हायरल झाले आहे. यामुळे समाजात जातीचे राजकारण पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा प्रश्न उद्भवत आहे. अनेक लोकांनी या वर नाराजी व्यक्त केली आहे. 
 
यात धक्कादायक बाब म्हणजे बॅनरवर भाजप पक्षाचे चिन्ह आहे. या पोस्टरवर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांचा फोटो देखील आहे. तरी ही स्पर्धा पक्षाने आयोजित केलेली नसून त्या समाजापुरती मर्यादित असल्याचं सांगण्यात येत आहे.  माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रविंद्र चव्हाण यांचा बचाव करत म्हटले की या स्पर्धेशी रविंद्र चव्हाण यांचा, किंवा भाजपचा कोणताही संबध नाही. 
 
यावर भाजपने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे. सोबतच डोंबिवलीकर समजतूदार आणि सहनशील असल्यामुळे यावर काही प्रतिक्रिया देणार नाहीत असेही म्हटले आहे. मात्र आता पोस्टरवरून वाद वाढल्याने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ७ केंद्रीय पथकं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर