भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. न्यूझीलंड संघाने हा सामना 25 धावांनी जिंकला.
न्यूझीलंडच्या विजयात त्यांच्या फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची होती. टीम इंडियाला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडिया विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. त्यांनी हा ऐतिहासिक सामना 25 धावांनी जिंकला. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 147 धावांची गरज होती, पण भारतीय संघ 121 धावांवर ऑलआऊट झाला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे तिसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळला गेला. न्यूझीलंडने मुंबई कसोटीत भारताचा 25 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. भारतात भारताला 3-0 ने पराभूत करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला.
Edited By - Priya Dixit