Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 14 January 2025
webdunia

IND vs NZ T20 : आज भारत-न्यूझीलंड मालिका निर्णायक, सामना कधी आणि कुठे जाणून घ्या

IND vs NZ T20 : आज भारत-न्यूझीलंड मालिका निर्णायक, सामना कधी आणि  कुठे जाणून  घ्या
, बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (16:01 IST)
India vs New Zealand (IND vs NZ) 3रा T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २१ धावांनी पराभव केला होता.
दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. अशा स्थितीत दोन्ही संघ तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे.
 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना 1 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरभारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे..नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल. 
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड T20 मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत

दोन्ही संघातील संभाव्य11 खेळाडू
 
भारत: शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल/उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
 
न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (सी), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आळंदी ते पंढरपूर दरम्यान सासवड ते माळशिरस पर्यंतच्या पालखी महामार्गाच्या रस्त्याचे उर्वरित ३५ टक्के काम तातडीने पूर्ण करा