आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा वनडे खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना चार विकेटने जिंकला. आज भारतीय संघाची नजर श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याकडे आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शुभमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत 89 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याचे हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे. याआधी शुभमनने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर शतक झळकावले होते.
गिलचे वनडे क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. गुवाहाटीमध्ये शतकापासून दूर राहिलेल्या आणि कोलकात्यात चांगली सुरुवात केल्यानंतर विकेट गमावलेल्या गिलने तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पराक्रम पूर्ण केला. गिलने हे शतक केवळ 89 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले.त्याने कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 110 चेंडूत 131 धावांची भागीदारी केली.