सुरेश रैनाचा कहर 45 चेंडूत 63 धावा यानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी 56 च्या अर्धशतकानंतर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या 6 बळी यांच्या जोरावर भारतीय संघाने तिसर्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात इंग्लंडचा खेळ खल्लास करीत 75 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासोबत विराटसेनेने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
भारतीय संघाने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघ जिंकेल असे वाटत असताना विराट सेनेच्या धुरंधरांनी बाजी मारली. इंग्लंडकडून जसेन रॉय 32, ज्यो रूट 42 आणि कर्णधार इयॉन मॉर्गन 40 यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चहलच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची जादू चालू शकली नाही. चहलने सहा फलदाजांना माघारी धाडले.
चहलनंतर भारताकडून जसप्रित बुमराने 3 तर अमित मिश्राने 1 विकेट घेतली. चहलने मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार पटाकवला.