शुक्रवारपासून ट्रेंटब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याने संघाचा कर्णधार केन विल्यमसन या सामन्यातून बाहेर पडला आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल.
हॅमिश रदरफोर्डला संधी
सौम्य लक्षणांनंतर विल्यमसनची गुरुवारी रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी) झाली आणि आता तो पाच दिवस अलगावमध्ये असेल. संघातील उर्वरित सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी पुष्टी केली की विल्यमसनच्या जागी हॅमिश रदरफोर्ड संघात सामील होईल.
"एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केनला माघार घ्यावी लागली हे निराशाजनक आहे," स्टेड म्हणाला. हामिश याआधी कसोटी संघात होता आणि सध्या व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्टमध्ये लीसेस्टरशायर फॉक्सकडून खेळत आहे.