Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lasith Malinga : यॉर्कर किंग लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतणार

Lasith Malinga : यॉर्कर किंग लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतणार
, रविवार, 20 ऑगस्ट 2023 (13:56 IST)
Lasith Malinga : यॉर्कर किंग लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतणार आहे. 2021 मध्ये आयपीएलला अलविदा करणारा लंकेचा माजी वेगवान गोलंदाज पुढील हंगामात मुंबईचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक असेल. बऱ्याच दिवसांपासून या पदावर असलेल्या शेन बाँडची जागा मलिंगा घेणार असल्याचे वृत्त आहे. मलिंगा गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.यॉर्कर किंग लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन करणार आहे. 2021 मध्ये आयपीएलला अलविदा करणारा लंकेचा माजी वेगवान गोलंदाज पुढील हंगामात मुंबईचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक असेल. बऱ्याच दिवसांपासून या पदावर असलेल्या शेन बाँडची जागा मलिंगा घेणार असल्याचे वृत्त आहे.

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने काही वर्षांपूर्वी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. या खेळाडूने 2021 मध्ये फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली होती. मलिंगाने सुरुवातीपासून आयपीएलच्या प्रत्येक मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळून अनेक हंगाम जिंकले. पण आता हा खेळाडू पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.लसिथ मलिंगा आयपीएल 2024 साठी पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्समध्ये परतणार आहे.
 
 लंकेचा माजी वेगवान गोलंदाज पुढील हंगामात मुंबईचा वेगवान शेन बाँडच्या जागी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका घेणार. 

मलिंगाची मुंबई इंडियन्ससोबत खूप यशस्वी कारकीर्द होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाच जेतेपदे जिंकली. यामध्ये 2011 मध्ये चॅम्पियन्स लीग T20 जिंकण्याव्यतिरिक्त चार आयपीएल विजेते समाविष्ट आहेत.मलिंगाने यापूर्वी 2018 मध्ये संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. एका वर्षानंतर, त्याने खेळात पुनरागमन केले आणि जसप्रीत बुमराहसह संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 



Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jalgaon : ईडी कडून जळगावातील राजमल लखीचंद समूहावर छापे