2007 साली ज्या फटक्यामुळे पाकिस्तान संघ सामना व विश्वचषक हरला त्या फटक्याबद्दल पश्चाताप होत नाही, असे बेधडकपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने सांगितले. भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फाइन लेगला मारलेला स्कूपचा फटका श्रीशांतने टिपला. पाकिस्तानने विश्वचषक गमावला. काही दिवस वाईट वाटले; परंतु आयुष्यात पुढे जात राहणे ही गरज आहे असे तो म्हणाला.