Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहम्मद अझरुद्दीनने विराट कोहली एकदिवसीय आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर असण्यावर प्रश्न उपस्थित केले

मोहम्मद अझरुद्दीनने विराट कोहली एकदिवसीय आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर असण्यावर प्रश्न उपस्थित केले
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (16:55 IST)
भारतीय क्रिकेट संघाला काही दिवसांत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार असून त्या आधी कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. या दौऱ्यापूर्वी कसोटी संघाच्या घोषणे बरोबरच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घोषित केले की रोहित शर्मा T20 संघाचा कर्णधार असण्या सोबतच एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यानंतर रोहित दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर असल्याची बातमी आली, तर विराट वैयक्तिक कारणांमुळे वनडे मालिकेत खेळणार नाही.असे ही कळले आहे.  यावर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने प्रश्न उपस्थित केला आहे. या दोघांची कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतून बाद होण्याची वेळ अधिक चांगली होऊ शकली असती, असे अझहरचे मत आहे.
अझहरने ट्विटरवर लिहिले की, 'विराट कोहलीने  तो वनडे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याची माहिती दिली आहे, तर रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. ब्रेक घ्यायला हरकत नाही, पण वेळ चांगली निवडायला हवी. त्यामुळे दोघांमधील संघर्षाच्या बातम्यांना अधिक हवा मिळेल. भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा विराट आणि रोहित यांच्यातील संघर्षाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. T20 विश्वचषक 2021 च्या आधी, विराटने स्वतः ICC स्पर्धेनंतर T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यांनी म्हटले होते की ते ODI आणि कसोटी संघाचा कर्णधार राहणार .
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाच्या घोषणेसह, बीसीसीआयने सांगितले की, रोहित वनडे आणि टी-20 संघांचा कर्णधार म्हणून काम करत राहणार, तर विराट कसोटी संघाचे नेतृत्व करणार.अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून एक विधान आले की, हा निर्णय घेण्यापूर्वी निवडकर्ते आणि ते  स्वतः विराटशी याबद्दल बोलले होते. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये दोन वेगळे कर्णधार असू शकत नाहीत आणि त्यामुळेच रोहितकडे वनडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. विराटला टी-20 संघाचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती करण्यात आली होती, पण त्यांनी तसे केले नाही, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नासाठी मुलगा बनला मुलगी, FB वर झालेल्या प्रेमासाठी घर सोडलं, पण..