Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जाते : संजय मांजरेकर

धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जाते : संजय मांजरेकर
, मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (16:52 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. आयपीएलच्या युएईत रंगणाऱ्या हंगमाला आता एक महिन्याहून कमी अवधी उरला आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी संघ तयारीला लागले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या माध्यमातून धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. धोनीची फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. या स्पर्धेतील कामगिरीवरुन त्याच्या आंतरराष्ट्री कमबॅकचा मार्ग खुला होऊ शकतो, अशी चर्चाही गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
 
धोनी 2019 च्या जुलैमध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. मात्र धोनीने यावर अद्यापही मौन बाळगले आहे.
 
धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) पाहिले जात आहे. त्याच्यासोबत केएल राहुल आणि वृद्धिमान साहा ही मंडळी देखील शर्यतीत आहे. दरम्यान माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी धोनीच्या आयपीएल करियरसंदर्भा वक्तव्य केले आहे. 2021 मध्ये रंगणाऱ्या विश्वचषक टी-20 स्पर्धेपूर्वी धोनी आणि ऋषभ पंत दोन आयपीएल स्पर्धेत खेळतील. दोन्ही स्पर्धेतील कामगिरीवर टी-20 विश्वचषकातील भारतीय संघातील दावेदारी पक्की होईल, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रशियाने कोरोनाव्हायरसची लस बनविली, अध्यक्ष पुतिन यांच्या कन्याला लावली पहिली लस