Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई

ravindra jadeja
, मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:34 IST)

कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर त्याच कसोटीतल्या अखिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

श्रीलंका दौऱ्यातल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जाडेजाला या कारवाईमुळे खेळता येणार नाही. कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता.

या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार नंबरची गरज नाही